‘तारक मेहता’मध्ये जेठालालच पात्र कस मिळाल? दिलीप जोशी यांचा रंजक प्रवास
TMKOC Dilip Joshi : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC) गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांच मन जिंकत आहे. या शोमधील गोकुलधाम सोसायटी, दया-जेठालालची केमिस्ट्री, टप्पू सेनेची मस्ती, आणि सोसायटीतील ऐक्य यामुळे या शोने टीव्ही इतिहासात एक वेगळेच खास स्थान मिळवले आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की जेठालाल हे प्रेक्षकांच आवडत पात्र अभिनेता दिलीप जोशी (Dilip Joshi) यांना सुरुवातीला मिळणारच नव्हत?
दिलीप जोशी यांना मिळणार होत चंपकलालच पात्र!
एका जुन्या मुलाखतीत दिलीप जोशी यांनी खुलासा केला होता की, शोचे निर्माते असित मोदी यांनी त्यांना चंपकलाल गडा या पात्रासाठी विचारल होत. “असित भाई मला बालपणापासून ओळखतात. त्यांनी मला सांगितल की तू जे पात्र निवडशील, ते तूच कर. चंपकलाल घे किंवा जेठालाल, तुला जे वाटत ते कर,” अस दिलीप जोशी यांनी सांगितल.
जेठालाल मिळण्यामागच गमतीशीर कारण
दिलीप जोशी पुढे म्हणाले, “मी स्वत: तारक मेहतांचा कॉलम लहानपणापासून वाचत आलो होतो. त्यामुळे जेठालाल हे पात्र डोक्यात होत, पण कॉलममधील जेठालाल फारच दुबळा-पतळा दाखवलेला होता. मी म्हटल की मी चंपकलाल वाटणार नाही आणि जेठालाल देखील वाटणार नाही. पण मी प्रयत्न केला आणि शेवटी जेठालालच पात्र मला मिळाल.”
आज दिलीप जोशी यांनी साकारलेला जेठालाल हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक पात्र मानल जात. त्यांचा संवाद, अभिनयशैली आणि भावनात्मक प्रसंगांमधील सहजता यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून बसले आहेत.
हेही वाचा : बिग बॉस 19 मध्ये बबिता जींची एंट्री? मुनमुन दत्ता ‘तारक मेहता’ शो सोडणार.