लग्नाआधीच 34 मुलांची आई बनली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री

2 Min Read
Preity Zinta Mother Of 34 Girls (फोटो: सोशल मीडिया)

बॉलीवूडमध्ये आपल्या चुलबुल्या हसण्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारी अभिनेत्री प्रीती झिंटा (Preity Zinta) सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती कोणत्या चित्रपटामुळे नाही, तर तिच्या संवेदनशील आणि समाजाभिमुख निर्णयामुळे चर्चेत आली आहे.

प्रीती झिंटाची आई होण्याची अनोखी कहाणी

प्रीती झिंटाने 2009 साली तिचा 34वा वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला होता. या दिवशी तिने एक नवखा पण भावनिक निर्णय घेतला – तिने एक-दोन नव्हे, तर तब्बल 34 अनाथ मुलींना दत्तक घेतल. तिने या मुलींची जबाबदारी स्वीकारत, त्यांच्या शिक्षण आणि संगोपनाची काळजी घेण्याच वचन दिल. तिने हे देखील सांगितल होत की, वर्षातून किमान दोनदा ती त्या मुलींना भेटण्यासाठी ऋषिकेशला जाईल.

लग्न आणि मातृत्वातला टप्पा

2016 मध्ये प्रीती झिंटाने लग्न केल. त्यानंतर 2021 मध्ये तिने सोशल मीडियावरून जाहीर केल की, सरोगेसीच्या माध्यमातून तिला जुळी मुल – जय आणि जिया – झाले आहेत. प्रीती झिंटासाठी हा एक नवीन आणि आनंदाचा टप्पा होता.

क्रिकेटमध्येही तितकीच सक्रिय

चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी प्रीती क्रिकेटच्या मैदानात नेहमीच सक्रिय आहे. तिची IPL टीम पंजाब किंग्स यंदा 2025 च्या IPL फायनलमध्ये पोहोचली आहे. श्रेयस अय्यर यांच्या नेतृत्वाखाली टीमने उत्तम कामगिरी केली असून, प्रीतीचा आनंद आणि अभिमान सोशल मीडियावर स्पष्टपणे दिसून येतो.

एकेकाळची रुपेरी पडद्यावरील स्टार आज समाजसेवेपासून मातृत्व आणि IPL व्यवस्थापनापर्यंत अनेक भूमिकांमध्ये तितकीच प्रभावी ठरली आहे.

हेही वाचा : हाउसफुल 5 ने रिलीजआधीच कमावला इतक्या कोटींचा गल्ला, अक्षय कुमारचा ब्लॉकबस्टर धमाका.

Share This Article