Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: बिग बॉस 19 मध्ये बबिता जींची एंट्री? मुनमुन दत्ता ‘तारक मेहता’ शो सोडणार?

2 Min Read
Munmun Dutta Bigg Boss 19 Entry Taarak Mehta Exit रूमर्स (फोटो: इंस्टाग्राम)

Munmun Dutta Bigg Boss 19 Entry Taarak Mehta Exit Rumours : ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) ची तयारी सुरू झाली असून, यंदाचा हंगाम फक्त सेलेब्ससाठी असणार आहे अशी चर्चा आहे. याच दरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ फेम बबिता जी उर्फ मुनमुन दत्ता (Munmun Dutta) हिला शोसाठी अप्रोच केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता तिच्या शोमधील सहभागावरील चर्चा रंगली आहे.

मुनमुन दत्ता बिग बॉस 19 मध्ये?

मुनमुन दत्ताला याआधीही अनेकदा बिग बॉसच्या विविध हंगामांसाठी विचारण्यात आले होते, मात्र तिने प्रत्येक वेळी नकार दिला होता. या वेळी मात्र तिच नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. मेकर्स किंवा मुनमुन दत्ताने यावर अद्याप काहीही स्पष्ट केलेल नाही. पण सोशल मीडियावर फॅन पेजेस आणि चाहत्यांमध्ये ही बातमी वेगाने पसरत आहे.

बबिता ‘तारक मेहता’ शो सोडणार का?

जर मुनमुन दत्ता बिग बॉस 19 मध्ये सहभागी झाली, तर तिला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ शो सोडावा लागेल का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती या लोकप्रिय शोचा भाग आहे आणि तिच जेठालालसोबतच नात प्रेक्षकांना प्रचंड भावत. त्यामुळे ती जर शो सोडत असेल, तर तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसेल.

सध्या यावर कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण मुनमुन दत्ता जर बिग बॉसमध्ये गेली, तर तिथे तिच्या हजेरीन ती बिग बॉस 19 मध्ये नक्कीच रंगत आणेल हे नक्की.

हेही वाचा : हाउसफुल 5 ने रिलीजआधीच कमावला इतक्या कोटींचा गल्ला, अक्षय कुमारचा ब्लॉकबस्टर धमाका.

Share This Article