₹300 कोटींच्या हाउसफुल 5 ने पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी; अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांच्या कॉमेडी चित्रपटाची जोरदार सुरुवात Housefull 5 Day 1 Box Office Collection

2 Min Read
हाऊसफुल ५ चा बॉक्स ऑफिस कलेक्शन पहिला दिवस (फोटो : एक्स)

Housefull 5 Day 1 Box Office Collection : खिलाडी अक्षय कुमार आणि रितेश देशमुख (Akshay Kumar, Riteish Deshmukh) यांच्या धमाल कॉमेडी जोडीने सजलेला ‘हाउसफुल 5’ 6 जून रोजी प्रदर्शित झाला असून, या मल्टीस्टारर कॉमेडी फिल्मने बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे.

सकाळपासून थिएटर्समध्ये प्रचंड गर्दी दिसून आली आणि सायंकाळच्या शोजमध्ये गर्दी आणखीनच वाढली. तर ‘हाउसफुल 5’ ने पहिल्याच दिवशी ₹23 कोटींचा गल्ला जमवला असल्याचे सॅकमिल्कच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

मोठी स्टारकास्ट, मोठी सुरुवात

तरुण मनसुखानी दिग्दर्शित या बिग-बजेट चित्रपटामध्ये अक्षयसोबत संजय दत्त, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, आणि जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाखरी, चित्रांगदा सिंह अभिनेत्रींचा समावेश आहे.

चित्रपटाची हिंदी ऑक्युपेंसी सुमारे 21% होती आणि विशेषतः दुपारच्या शोमध्ये चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

‘हाउसफुल’ फ्रेंचायझीतील सर्वात मोठ्या बजेटचा आणि सर्वाधिक कलाकार असलेला चित्रपट

हाउसफुल फ्रेंचायझीची सुरुवात 2010 साली झाली होती आणि तेव्हापासून ही फ्रेंचायझी प्रेक्षकांसाठी हास्याचा खात्रीशीर डोस ठरली आहे.
‘हाउसफुल 5’ हा या मालिकेतील सर्वात मोठ्या बजेटचा आणि सर्वाधिक कलाकार असलेला चित्रपट आहे, जो तब्बल ₹300 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

वीकेंडला आणखी उंच झेप अपेक्षित

हाउसफुल 5 ची पहिल्या दिवसाची कमाई पाहता, हाउसफुल 5 वीकेंडमध्ये आणखी मोठ्या गल्ल्याची झेप घेईल असा अंदाज आहे. आता प्रेक्षकांची नजर आहे शनिवार-रविवारच्या कलेक्शनवर, जे दोन दिवस चित्रपट हिट ठरण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरू शकतात.

हेही वाचा : 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला सर्वात मोठा कॉमेडी प्रोजेक्ट; फ्रेंचायझीचा कमाईचा इतिहास जाणून घ्या.

Share This Article