Housefull 5 Box Office Akshay Ritesh Comedy Success : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि कॉमेडी किंग रितेश देशमुख पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज 6 जून 2025 रोजी ‘हाउसफुल 5’ हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून, या लोकप्रिय कॉमेडी फ्रेंचायझीच्या पाचव्या भागाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला बिग-बजेट कॉमेडी चित्रपट
तरुण मनसुखानी दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित ‘हाउसफुल 5’ हा चित्रपट जवळपास 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वात मोठा कॉमेडी प्रोजेक्ट मानला जातो.
जबरदस्त स्टारकास्ट
हाउसफुल 5 या भागामध्ये अक्षय-रितेश यांच्यासोबत संजय दत्त, नाना पाटेकर, अभिषेक बच्चन, तसेच सोनम बाजवा, नरगिस फाखरी, चित्रांगदा सिंग, जैकलीन फर्नांडिस यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. तब्बल २० हून अधिक कलाकार या चित्रपटात सहभागी आहेत.
हाउसफुल फ्रेंचायझीच्या यशाची वाटचाल:
▪️ Housefull (2010) – ₹75 कोटी कमाई
▪️ Housefull 2 (2012) – ₹112 कोटी (पहिल्यांदा 100 कोटी क्लबमध्ये)
▪️ Housefull 3 (2016) – ₹110 कोटी
▪️ Housefull 4 (2019) – ₹210 कोटी (पुनर्जन्म थीम, ग्रँड स्केल)
▪️ Housefull 5 (2025) – 300 कोटींचा खर्च, कमाईबाबत मोठी अपेक्षा
बॉक्स ऑफिसवर अपेक्षा वाढल्या
‘हाउसफुल 4’ नंतर चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आता हाउसफुल 5 पूर्वीच्या सर्व भागांपेक्षा जास्त कमाई करेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हेही वाचा : बोल्ड सीन्सबाबत काय म्हणाली श्रीया पिळगावकर?