Housefull 5: हाउसफुल 5 ने रिलीजआधीच कमावला इतक्या कोटींचा गल्ला, अक्षय कुमारचा ब्लॉकबस्टर धमाका

1 Min Read
Housefull 5 Advance Booking Collection (फोटो: इंस्टाग्राम)

‘हाउसफुल 5’ ची थिएटरमध्ये धूम; रिलीजआधीच केल कोट्यवधींच्या कमाईच रेकॉर्ड!

Housefull 5 Advance Booking Collection 2025 : ‘हाउसफुल 5’ हा अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच कमाईच्या बाबतीत चर्चेत आला आहे. अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमधून तब्बल 4.78 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची ओपनिंग जबरदस्त होणार याची खात्री झाली आहे.

‘हाउसफुल 5’ 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. साजिद नाडियाडवाला यांची ही सुपरहिट फ्रँचायझी यावेळी दोन वेगवेगळ्या वर्जनमध्ये (5A आणि 5B) रिलीज होणार असून, दोन्हींचे क्लायमॅक्स वेगवेगळे असणार आहेत.

फिल्ममध्ये अक्षय कुमारसोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, नाना पाटेकर, फरदीन खान, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, जैकी श्रॉफ, जॉनी लीवर, चंकी पांडे अशा बड्या स्टार्सचा ताफा झळकणार आहे.

2 जूनपासून अ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी 24,000 हून अधिक तिकिट विकली गेली आहेत. आतापर्यंत जवळपास 45,000 तिकिटांची विक्री झाली असून, शो हाऊसफुल्ल होत असल्याच चित्र आहे.

चित्रपटप्रेमी आणि विनोदी चित्रपटांचे चाहते ‘हाउसफुल 5’ साठी प्रचंड उत्सुक असल्याने, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणार हे निश्चित मानल जात आहे.

Share This Article