तुषार कपूरने विकली जितेंद्र यांची अंधेरीतील प्रॉपर्टी; चकित करणारी आहे या व्यवहाराची किंमत Jeetendra Andheri Property Sold

1 Min Read
Jeetendra Andheri Property Sold

Jeetendra Andheri Property Sold : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आता जरी रुपेरी पडद्यावर दिसत नसले तरीही ते वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी अंधेरीतील आपली प्रॉपर्टी विकली असून, या व्यवहाराची किंमत चकित करणारी आहे.

८५५ कोटींचा व्यवहार

मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र यांच्या अंधेरीतील मालमत्तेचा सौदा ८५५ कोटी रुपयांमध्ये करण्यात आला आहे. ही प्रॉपर्टी त्यांच्या मुलगा तुषार कपूर याने विकली आहे. या व्यवहारासाठी ८.६९ कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी आणि ३०,००० रुपये नोंदणी फी भरण्यात आली आहे.

कुणी खरेदी केली प्रॉपर्टी?

ही मालमत्ता एनटीटी ग्लोबल डेटा सेंटर्स अँड क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने विकत घेतली आहे. याआधी या कंपनीला नेटमॅजिक आयटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखल जात होत.

जितेंद्र यांचा सिनेमातील यशस्वी प्रवास

जितेंद्र यांचा अभिनय कारकीर्द अजरामर आहे. 1967 मध्ये आलेल्या ‘फर्ज’ या चित्रपटातून त्यांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘हिम्मतवाला’, ‘तोहफा’, ‘खुदगर्ज’, ‘आशा’, ‘थानेदार’, ‘मवाली’, ‘धरमवीर’* अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

व्यवसायातही आघाडीवर

चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ यशानंतर जितेंद्र यांनी व्यवसायिक क्षेत्रातही पाऊल ठेवले असून त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता आहेत. अंधेरीतील ही विक्री ही त्यांच्या गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून एक मोठा निर्णय मानला जातो.

हेही वाचा : बोल्ड सीन्सबाबत काय म्हणाली श्रीया पिळगावकर?.

Share This Article