मुंबई: Shriya Pilgaonkar Chhal Kapat The Deception Zee5 — मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री श्रीया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) सध्या तिच्या निवडक आणि प्रभावी भूमिकांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने एका मुलाखतीत ऑनस्क्रीन बोल्ड सीन्सबाबत स्वतःची भूमिका मांडली आणि अशा प्रसंगी मिळणाऱ्या कुटुंबाच्या पाठिंब्याविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.
श्रियाने स्पष्ट केल की, कलाकृतीच्या गरजेनुसार जेव्हा दृश्य गरजेच वाटल, तर तिन ते आत्मविश्वासान साकारल. अभिनय करताना ती नेहमीच संपूर्ण स्क्रिप्ट समजून घेते आणि त्या पात्राच्या भावना समजून घेते. कोणताही निर्णय हा ‘कथा’ आणि ‘दिग्दर्शकाची मांडणी’ यावर आधारित असतो, अस ती म्हणाली.

पुढे ती म्हणाली, “माझे आई-वडील कलाकार असल्याने त्यांना या सृष्टीची पूर्ण जाण आहे. त्यांनी कधीही माझ्या कलात्मक स्वातंत्र्यावर बंधन घातल नाही. उलट, त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिल.”
श्रियाचा आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणा तिला इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळ बनवतो. ‘मिर्झापूर’, ‘गिल्टी माइंड्स’ यासारख्या वेगवेगळ्या वेब सिरीजमधून तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे.

अभिनेत्री श्रिया पिळगावकर सध्या तिच्या आगामी वेब सिरीज ‘छलकपट: द डिसेप्शन’ मुळे चर्चेत आहे. ही सिरीज 6 जून 2025 रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाली आहे. श्रिया या सिरीजमध्ये SP देविका राठोड या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, ज्यात ती एका रहस्यमय खुनाच्या प्रकरणाची चौकशी करताना दिसते.

‘छलकपट: द डिसेप्शन’ — कथानकाची झलक
छलकपट ही वेबसिरीज मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथील एका लग्नसमारंभाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. लग्नाच्या तयारीदरम्यान, शालू नावाच्या सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचा संशयास्पद मृत्यू होतो. या प्रकरणाची चौकशी SP देविका राठोड (श्रिया पिळगावकर) करत असून, या चौकशीत अनेक रहस्ये उलगडली जातात. कथानकात मैत्रिणींच्या जुन्या आठवणी, दडपलेला राग आणि असुरक्षितता यांचा सुरेख संगम आहे.

श्रिया पिळगावकरची भूमिका
श्रिया पिळगावकरने या सिरीजमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. ती म्हणते, “देविका ही केवळ एक अधिकारी नाही, तर तिच्या भूतकाळाच्या छायेतून ती तिच्या चौकशीच्या पद्धती विकसित करते. ती कठोर आहे, पण तिच्या स्त्रीत्वाला ती कधीच गमावत नाही.” या भूमिकेतून श्रियाने पोलिस अधिकाऱ्यांच्या पारंपरिक प्रतिमेला नवा आयाम दिला आहे.
👉 हिंदीत नाव कमावलेली श्रिया पिळगावकर मराठी सिनेमात का नाही दिसत? अभिनेत्रीन स्पष्ट केल कारण.