Baahubali Re Release: भारतीय सिनेसृष्टीत ऐतिहासिक ठसा उमटवणारा चित्रपट बाहुबली पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्या बाहुबली: द बिगिनिंग (2015) आणि बाहुबली: द कन्क्लूजन (2017) या सुपरहिट चित्रपटांचे री-रिलिझ केले जाणार असून, यामध्ये एक खास ट्विस्ट असेल.
काय आहे नविन ट्विस्ट?
चित्रपट निर्मात्यांनी यावेळी दोन्ही भागांतील मुख्य-मुख्य सीन्स एकत्र करून, एका नव्या फॉरमॅटमध्ये वैश्विक पातळीवर रिलीज करण्याचा विचार केला आहे. म्हणजेच, प्रेक्षकांना एकाच चित्रपटात संपूर्ण बाहुबली कथा एका वेगळ्या अंगाने अनुभवता येणार आहे. हा प्रयोग भारतीय सिनेसृष्टीत एक नवा ट्रेंड सुरू करू शकतो.
कमाईचे मोठे विक्रम
बाहुबलीच्या दोन्ही चित्रपटांनी मिळून तब्बल 2,460 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली होती. यामध्ये बाहुबली 1 ने 650 कोटी तर बाहुबली 2 ने 1,810 कोटी रुपये कमावले होते. प्रभास, अनुष्का शेट्टी आणि राणा दग्गुबती यांच्या अभिनयाने या सिनेमाने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवल.
प्रभास आणि राजामौली स्टारडमच्या शिखरावर
बाहुबली 1 आणि 2 या दोन्ही चित्रपटांनी तेलुगू सिनेमाची ताकद पूर्ण जगासमोर दाखवून दिली. प्रभास आणि राजामौली यांना या प्रोजेक्टने स्टारडमच्या शिखरावर पोहचवल. संगीतकार एम.एम. कीरवानी यांच संगीतही तितकच लोकप्रिय ठरल.
प्रभासचा आगामी चित्रपट
बाहुबली नंतर प्रभास आता द राजा साब या हॉरर-कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी रिलीज होणाऱ्या या सिनेमात तो डबल रोलमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच दिग्दर्शन मारुती यांनी केल असून, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि ऋद्धि कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील.
हेही वाचा : लग्नाआधीच 34 मुलांची आई बनली होती ही प्रसिद्ध अभिनेत्री.