Jamie Lever: जेमी लीव्हरचा धक्कादायक अनुभव; समोर अश्लील कृत्य करत उभा राहिला “मी थरथरत होते…”

2 Min Read
Jamie Lever Traumatic Childhood Incident Revealed (फोटो: सोशल मीडिया)

Jamie Lever Traumatic Childhood Incident Revealed : जॉनी लीव्हर यांची कन्या आणि सुप्रसिद्ध कॉमेडियन जेमी लीव्हर ने अलीकडेच आपल्या आयुष्यातील एक धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. लोकांना हसवणारी ही हसतमुख कलाकार आपल्या लहानपणीच्या एका भयानक प्रसंगाविषयी बोलताना भावूक झाली. या प्रसंगामुळे तिच आयुष्यच बदलून गेल, अस ती म्हणाली.

Jamie Lever
Jamie Lever (फोटो: इंस्टाग्राम @its_jamielever)

“तो क्षण मी विसरू शकत नाही”

एका मुलाखतीत जेमीने सांगितल की, जेव्हा ती 10-12 वर्षांची होती, तेव्हा शाळेच्या बाहेर गाडीत बसलेली असताना एक अनोळखी व्यक्ती तिच्या समोर आला आणि रस्त्यातच अश्लील कृत्य करत उभा राहिला. ती म्हणाली, “तो तसाच गाडीजवळ येऊन माझ्याकडे बघत उभा राहिला… मी खूप घाबरले, मी थरथरत होते. मला वाटल तो गाडीच दार उघडेल.”

त्यानंतर तिने लगेच गाडीच दार लॉक केल. मग काही क्षणांनी तो माणूस निघून गेला, पण त्या घटनेचा तिच्या मनावर खोल आघात झाला.

Jamie Lever
Jamie Lever (फोटो: इंस्टाग्राम @its_jamielever)

घरच्यांनाही सांगितल नाही

“माझ वय लहान होत, आणि मला कळालच नाही की काय घडल. त्यामुळे मी आई-वडिलांनाही काही सांगितल नाही,” अस जेमीन स्पष्ट केल. तिने पुढ सांगितल की त्या अनुभवामुळे ती अनेक वर्ष सर्वच पुरुषांपासून अंतर राखून राहिली. डेटिंग आणि रिलेशनशिपसारख्या गोष्टी तिच्या आयुष्यात खूप उशिरा आल्या.

Jamie Lever News
Jamie Lever News (फोटो: इंस्टाग्राम @its_jamielever)

वडिलांप्रमाणेच यशस्वी कॉमेडियन

जेमीने 2015 मध्ये ‘किस किसको प्यार करूं’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल. त्यानंतर ‘हाऊसफुल 4’, ‘भूत पोलिस’ आणि ‘क्रॅक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती झळकली. जेमीने साउथ इंडस्ट्रीतही काम केल आहे.

हेही वाचा : ‘विवाह’ फेम अमृता राव चित्रपटसृष्टीपासून का गेली दूर? ती सध्या काय करतेय?.

Share This Article